मुरबाड मध्ये श्रीशिवजयंती रक्तदान व्दारे साजरी

दिनांक : २८ मार्च २०२४
मुरबाड तालुक्यात संघटीत, The DEF ( डॉक्टर्स व इंजिनीअर्स फाऊंडेशन ) या संस्थे व्दारे आज शिवजयंती निमित्ताने शिवजन्मोत्सव सोहळा व रक्तदान शिबिर मुरबाड मधील श्रीराम मंदिर येथे आयोजित करण्यात आले.

‘श्रीशिव स्वरक्त समर्पण शिबिर’ असे नामकरण करण्यात आलेल्या या कार्याची सुरवात मुरबाड मधील छत्रपती श्रीशिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.

या कार्यात एकूण १६९ जण रक्तदान करण्या करता आले त्यापैकी सुमारे १२८ जणांचे रक्तदान यशस्वी झाले.

यासोबतच एका बाजूने, ‘श्रीशिव कार्य व आदर्श’ या विषयावर एकूण ५ व्याख्यान झाली. याद्वारे डॉ.श्री किरण साळुंखे जी, श्री. शैलेंद्र सिंग जी, श्री. विराज घरत जी, श्री. रोहिदास भागवत जी व कु. राज घोलप जी यांस सन्मानित करण्यात आले.

कार्य यशस्वीरीत्या पार करण्यासाठी मेहनत घेतलेल्या DEF च्या सर्वच अधिकृत सदस्य RCM ( Registered Club Members ) चे समाजातील सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. मागील ४ वर्षांपासून मुरबाड मध्ये CLUB मधील सदस्यांची कार्य करण्याची शिस्त, नम्रता व निःस्वार्थ राष्ट्रसेवा भाव सर्व तरुणांना आदर्श प्रस्थापित करत आहे.

 

मागील वर्षी CLUB व्दारे, श्रीशिवजयंती बोंडेखळ वाडी या वनवासी वस्तीत आरोग्य शिबीर, कपडे वाटप व एकत्रित स्नेहभोजन व्दारे साजरी करण्यात आली होती. व यावर्षी पासून पुढील प्रत्येक वर्षी श्रीशिवजयंती ला रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. याद्वारे, तिथीनुसार येणाऱ्या शिवजयंतीला शिवरायांच्या शिकवणी नुसार राष्ट्रसेवा कार्य करण्याचा सामाजिक संदेश DEF व्दारे स्व:कृतीतून देण्यात येत आहे.
या कार्यात सहभागी झालेल्या व सहकार्य केलेल्या सर्वच नागरिकांचे तसेच, मुंबई येथील सर जेजे हॉस्पिटल येथील रक्तपेढीचे DEF व्दारे अभिनंदन व आभार मानले गेले.

यासोबतच, DEF व्दारे यावेळी CLUB मुरबाड प्रमाणेच CLUB शहापूर सुरू करण्याचेही जाहीर करण्यात आले. नागरिकांना DEF च्या CLUB सोबत जुडायचे असल्यास अधिकृत संपर्क +९१ ९३७०६५१३१८ वर व्हॉट्सअँप व्दारे आपले नाव, ठिकाण व संपर्क क्रं. पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *